Share

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर शिवनारायण चंद्रपॉल बनला अमेरिकेचा कोच!

Published On: 

मुंबई : वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी क्रिकेटर शिवनारायण चंद्रपॉल याची अमेरिकेच्या वरिष्ठ महिला आणि अंडर-१९ महिला संघांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑर्लॅंडो, फ्लोरिडा येथे स्थित, चंद्रपॉल सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग संघ जमैका तलावाहसचे मुख्य प्रशिक्षक आहे. त्याने अलिकडेच अंडर-१९ वेस्ट इंडिज पुरुष संघासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले आहे.

युनायटेड स्टेट्स महिला अंडर-१९ संघ ३ जुलै रोजी कॅरेबियन भूमीत क्रिकेट वेस्ट इंडिजमध्ये अंडर-१९ रायझिंग स्टार्स टी-२० चॅम्पियनशिपसाठी रवाना होईल. ही स्पर्धा ३ ते १३ जुलै दरम्यान त्रिनिदाद येथे खेळवली जाईल. चंद्रपॉलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २० वर्षांहून अधिक काळ चालली. ४५४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २०,९८८ धावा केल्या ज्यात ४१ शतके आणि १२५ अर्धशतकांचा समावेश आहे. १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांपैकी तो एक आहे. या यादीत त्याच्या आधी ब्रायन लाराचे नाव आहे.

चंद्रपॉलचा दीड वर्षांचा करार २०२३च्या अखेरीस संपणार आहे. चंद्रपॉल म्हणाला, ”अमेरिका महिला राष्ट्रीय संघ आणि महिला अंडर-१९ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे मी उत्साही आहे. महिलांचा खेळ हा असा आहे की ज्याचा मी मोठा पुरस्कर्ता आहे. मी माझा २० वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव उपयोगी आणणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!