Share

ENG vs IND : आर्रर्रर्र..! दीपक हुडाचा षटकार आणि थोडक्यात बचावले रवी शास्त्री; VIDEO होतोय व्हायरल!

Published On: 

मुंबई : टीम इंडियाकडून खेळताना मिळत असलेल्या संधींचा फायदा करून घेण्यात दीपक हुडा चुकत नाही. हुडाने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० (ENG vs IND) मध्येही शानदार फलंदाजी केली. मोठी खेळी खेळतानाही तो हुकला. पण, त्याने १७ चेंडूत ३३ धावा करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. रोहित शर्मा (२४) बाद झाल्यानंतर हुडा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि येताच त्याने इंग्लिश गोलंदाजांसमोर आपले इरादे स्पष्ट केले. हुडाने पहिल्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही. पण, पुढच्या दोन चेंडूंवर त्याने दोन षटकार ठोकले.

मोईन अली भारतीय डावातील पाचवे षटक टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर दीपकने लाँग ऑनवर षटकार ठोकला. चेंडू थेट स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गेला. त्यावेळी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इंग्लंडचा माजी कर्णधार माइक अथर्टन कॉमेंट्री करत होते. चेंडू त्यांच्या दिशेने येताना पाहून दोघेही बाजूला झाले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चेंडू थेट कॉमेंट्री बॉक्सच्या आत गेल्याचे दिसून येते.

https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1545232710213713920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1545232710213713920%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-deepak-hooda-massive-6-almost-hits-ravi-shastri-in-commentary-box-in-india-vs-england-1st-t20i-watch-video-4375882.html

यापूर्वी दीपकने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली फलंदाजी केली होती. दीपकने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ५७ चेंडूत १०४ धावांची तुफानी खेळी केली. पहिल्या टी-२० मध्येही त्याने नाबाद ४७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० पूर्वी डर्बीशायरविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ५९ धावा केल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्या (५१) आणि सूर्यकुमार यादव (३९) यांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत १९८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १४८ धावांत सर्वबाद झाला. हार्दिकने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. त्याने ४ विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलनेही २-२ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!