Share

ENG vs IND 1st T20I : पहिल्याच चेंडूवर बटलरनं टेकले गुडघे..! भुवनेश्वर कुमारनं केलं क्लीन बोल्ड; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा भुवनेश्वर कुमार नव्या चेंडूसह चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. तो चेंडू स्विंग करण्यात माहिर आहे आणि टी-२०च्या पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे. इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पहिल्या टी-२० भुवनेश्वरने पुन्हा एकदा संघाला मोठे यश मिळवून दिले. जोस बटलर हा स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ४ शतकांच्या मदतीने ८५० हून अधिक धावा केल्या होत्या. पण पहिल्याच सामन्यात तो भुवीसमोर अपयशी ठरला. टीम इंडियाने हा सामना ५० धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम खेळताना १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४८ धावा करून बाद झाला.

इंग्लिश डावातील पहिले षटक भुवनेश्वर कुमारने टाकले. सलामीवीर फलंदाज जेसन रॉय पहिल्या ३ चेंडूंवर धावा करू शकला नाही. चौथ्या चेंडूवर त्याने मिडविकेटवर धाव घेतली. कर्णधार जोस बटलर प्रथमच पाचव्या चेंडूवर खेळायला आला आणि पहिल्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तो पाचव्यांदा शून्यावर बाद झाला.

भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेच्या पहिल्या ३ षटकात फक्त १० धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्यामुळे इंग्लिश संघाला पहिल्या ६ षटकांत केवळ ३२ धावाच करता आल्या. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत ६७ सामन्यांत २४च्या सरासरीने ६७ बळी घेतले आहेत. २४ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!