🕒 1 min read
नाशिक : राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर अखेर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. मात्र दिवसेंदिवस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ३९ आमदारानंतर आता १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर काल ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, हिंदूत्वावादी म्हणून घेणाऱ्या ४० जणांनी भूमिका स्पष्ट करावी. जी पुन्हा उभी राहणार आहे ती खरी शिवसेना. मातोश्री माझी, शिवसेना माझी…असं म्हणाणाऱ्यांनी स्वतः सर्व निर्माण कराव. शिवसेना अजुनही भक्कम आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे आहे आणि सेनेचेच राहणार अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
संजय राऊत बोलताना म्हणाले कि, महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामे आहे. त्यामुळे वाघ आता गरुड झेप घेणार आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार, असे म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.
महत्वाच्या बातम्या


