Share

“ओबीसी आरक्षण घालवणे हे महाविकासआघाडीचं पाप” ; फडणवीसांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक आज मुंबई येथे पार पडली. बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला जबाबदार धरत जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “आम्ही यापूर्वीही सांगितलं आहे आणि आम्ही वारंवार म्हणतो की, ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे. याला संपूर्णपणे जबाबदार फक्त महाविकास आघाडी आहे.” ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे.

“ओबीसी आरक्षणावर भाजप आणि भाजपचे नेते हे सातत्याने संघर्ष करीत आहेत. डिसेंबर १९ ते मार्च २२ या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले आहे. जी कार्यपद्धती मध्यप्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्यप्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नाही,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!