Share

IPL 2022 : सुरेश रैनाची भविष्यवाणी! म्हणतोय ‘या’ संघाने जिंकावी आयपीएल ट्रॉफी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात आता शेवटचे प्लेऑफमधील चार सामने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या लढाईत बाजी कोण मारणार आणि आयपीएल विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगामात २ नव्या संघांनी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. याच दरम्यान चेन्नईचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने मोठं विधान केलं आहे.

आयपीएल २०२२ हंगामाच्या लिलावात सुरेश रैनाला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते तो अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर रैना त्याच्या चाहत्यांना कमेंट्री करतना पाहायला मिळाला. सुरेश रैनाने यंदाच्या हंगामातील विजेतेपद कोणी जिंकावे यावर भाष्य केलं आहे. सुरेश रैनाला यावेळी विराट कोहलीची दयाही आल्याचं पाहायला मिळालं.

रैनाच्या म्हणण्यानुसार यंदाचे विजेतेपद बंगळुरू संघाने जिंकायला हवे. विराट कोहलीसाठी बंगळुरू संघाने हे विजेतेपद जिंकायला हवे असं रैना म्हणाला आहे. रैनाचं हे मत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही बंगळुरू संघाने आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचूनही बंगळुरू संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी इतिहास बदलण्याची संधी बंगळुरू संघाला असणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये ५५२८ धावा करण्याचा विक्रम आहे. सुरेश रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ३९ अर्धशतक आणि १ शतक झळकावलं आहे. सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखलं जातं. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये तो अनसोल्ड राहिला होता. सुरेश रैनाचा जुना आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सनेही त्याला पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं नव्हतं.

यंदाच्या हंगामात बंगळुरू संघाची कामगिरी

बंगळुरू संघ यंदाच्या आयपीएल हंगामात चांगला खेळताना दिसला. काही सामन्यांमध्ये संघ कमकुवत वाटला मात्र संघातील खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर बंगळुरू संघाने प्लेऑफची पात्रता फेरी गाठली आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात ८ सामने जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. आता प्लेऑफमध्ये बंगळुरूचा सामना लखनऊशी २५ मे ला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!