🕒 1 min read
मुंबई : भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) दिग्गज खेळाडू अंबाती रायुडू आगामी देशांतर्गत हंगामात बडोद्याकडून खेळण्याची शक्यता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील चार मोसमात बडोद्यासाठी क्रिकेट खेळले आहे आणि संघात पुनरागमन करण्यासाठी तो हैदराबाद सोडण्यास तयार आहे. रायुडूने आगामी देशांतर्गत हंगामात बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA) कडे कळवली आहे.
गेल्या वर्षी, बडोद्याचा कर्णधार कुणाल पंड्यासोबत वाद झाल्यानंतर, दीपक हुडा बडोदा संघ सोडून राजस्थानमध्ये दाखल झाला होता. त्याचा पर्यायी खेळाडू सध्या बीसीए शोधत आहे. ३६ वर्षीय रायुडू पुढील महिन्यात बडोद्याच्या प्राथमिक प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची शक्यता आहे.
“Ambati Rayadu had approached us before the start of the IPL and expressed his desire to play for us,” a senior Baroda Cricket Association official said. https://t.co/qvScJIiL4c
— Circle of Cricket (@circleofcricket) May 23, 2022
अंबाती रायुडूने ९७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६१५१ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने भारतासाठी ५५ एकदिवसीय आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. नुकताच तो निवृत्तीबाबत केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आला होता. CSK व्यवस्थापनाच्या हस्तक्षेपानंतर त्याला हे ट्वीट काढून टाकावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
