Share

दहशतवादी संघटनांशी संबंधित तरूणाला पुण्यातून अटक

Published On: 

पुणे :  पुण्यातून एका तरुणाला पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध या आरोपाखाली पुण्यातील दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आता दापोडी परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव जुनेद मोहम्मद असे आहे. काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडींग झाल्याचा आरोप जुनेद मोहम्मद याच्यावर आहे. हा तरूण काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता असाही आरोप त्याच्यावर आहे. पुणे दहशतवादविरोधी पथकाला याची माहिती मिळताच या तरूणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तरूणाला पुणे न्यायालयात आज दुपारी ३ वाजता हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित म्हणून आढळल्यावर या तरुणाची काल दुपारपासून चौकशी चालू होती. पोलीस चौकशीत हा तरुण दोषी असण्याची शक्यता आढळून आल्यावर, रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती पोलिसांनी दिली आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील जुनेद मुळचा रहिवाशी आहे. जुनेद हा मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेशी देखील त्याचे संबंध असल्याचे चौकशीतून समोर आलं असल्याचे, पोलिसांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!