🕒 1 min read
मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक त्याच्या वेगाच्या जोरावर आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या मोसमात चमकला. या स्पर्धेत त्याने २२ विकेट घेतल्या. उमरान मलिकला या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर उमरान मलिकने त्याचा गुरू इरफान पठाणची भेट घेतली आणि दोघांनीही सेलिब्रेशन केले. इरफान पठाणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये उमरान मलिक केक कापताना दिसत आहे. यात उमरानचा सहकारी खेळाडू अब्दुल समदही दिसत आहे.
A tiny Celebration … #debut ???????? #UmranMalik pic.twitter.com/OzSBRoaRVZ
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 23, 2022
इरफान पठाणने जम्मू-काश्मीर संघाच्या मेंटॉरची भूमिका बजावली होती आणि त्यादरम्यान त्याने उमरान मलिकला बारकावे शिकवले होते. उमरान मलिकने एका मुलाखतीत इरफान पठाणने त्याला कशी मदत केली हे सांगितले होते. उमरानचा संघ आयपीएल २०२२च्या प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. उमरान हा मोसमात सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला.
https://www.instagram.com/p/Cd5Xj05gWGX/
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
