बुलडाणा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारलं होत. मात्र या सर्व गोष्टींमध्ये सत्ताबदल होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना चांगलाच धारेवर धरलं होत. यानंतर आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांवर पलटवार केलाय.
पत्रकारपरिषदेत बोलताना संजय गायकवाड म्हणाले कि, शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांना कुणाला डुक्कर म्हटलं, कुणाला रेडा म्हटलं, तर काही महिला आमदारांना वेश्या म्हटलं. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो. आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यामुळे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं. अशी सडसडून टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.
तर संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी संजय गायकवाड हे बुलडाणा येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच आमच्या बॅनर जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो असणार म्हणजे असणार. त्याला आम्ही कोणी अडवू शकणार नाही, असं देखील ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

