🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. तर आज शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. काल १६४ मते भाजपच्या सभापती उमेदवाराच्या बाजूने पडली आणि आजही शिंदे यांना तेवढीच मते पडली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला संबोधित केले.
यादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आमचे लोक जेव्हा झोपायचे तेव्हा मी फडणवीस यांना भेटायचो आणि भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा व्हायची. कारण राजकारणात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विचारधारेशी जुळतात. भाजप-शिवसेनाची या अगोदरही अनेक वर्ष युती राहिली आहे.’
‘अजित पवार म्हणाले पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. मात्र, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. भाजपासोबत आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू.’ असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पदाच्या लालसेपोटी मी कधीही प्रचार सुरू केला नाही. कधीही कुटुंबाची काळजी घेतली नाही. मी माझ्या समर्थकांना सांगितले की, त्यांचे नुकसान होत असेल, तर शिवसेनेला वाचवण्यासाठी मी एकटा शहीद झालो तरी चालेल. मी लढेन आणि मरेन, पण मी मागे हटणार नाही. राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान माझ्याशी खालच्या दर्जाची वागणूक मिळाली. माझे बाप काढण्यात आले.”
शिंदे सरकारने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. सरकारच्या बाजूने १६४ मते पडली तर विरोधात ९९ मते पडली. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या मते काही आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केले. काल झालेल्या सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या सभापतींच्या बाजूने १०७ मते पडली. या अर्थाने आज ८ मते कमी पडली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
