मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता – फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीकडून कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी गुजरात मध्ये गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर याच खापर फोडलं. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील उद्याेग गुजरातमध्ये गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राल धोके, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जूना व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी राणा भीमदेवी थाटात वेदांता ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय, असे जाहीरपणे विधानसभेत सांगितले होते.
आपल्या पहिल्याच अधिवेशनात दिलेले वचन मुख्यमंत्री पूर्ण करत नसतील तर पुढील काळात होणाऱ्या जुमलेबाजीचा अंदाज महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेला आलाच असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आम्ही बंडखोरी केली, असं सातत्याने शिंदे गट सांगत आला आहे. आता शिंदे गटावर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जपण्याची मोठी जबाबदारी आहे. ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प पुन्हा एकदा तळेगावमध्ये कसा येईल, यावर आपला वेळ खर्ची करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट-
महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ यांना केल्याचे अजित पवार म्हणाले.
राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा प्रकल्प घाट –
अजित पवार म्हणाले, वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे.
महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न –
महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) केला आहे, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sandeep Deshpande | “बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे”
- Congress | गोव्यामध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटले, भाजपमध्ये करणार प्रवेश
- Brahmastra Box Office Collection Day 5 | ‘ब्रह्मास्त्र’ ने 5 दिवसात 150 कोटींचा टप्पा पार केला..
- Vedanta Foxcon | महाराष्ट्राचा वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला का गेला? जाणून घ्या
- Mission Lotus | महाराष्ट्रनंतर गोवामध्ये भाजपचं मिशन लोटस, काँग्रेसला पडणार मोठं खिंडार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

