Share

Mission Lotus | महाराष्ट्रनंतर गोवामध्ये भाजपचं मिशन लोटस, काँग्रेसला पडणार मोठं खिंडार

Published On: 

गोवा : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड करून उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यत सत्तांतर झाल्यानंतर भाजप अनेक ठिकाणी त्यांचं मिशन लोटस करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अशातच महाराष्ट्र नंतर पुढचा टार्गेट आता गोवा असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

गोवा मध्ये भाजप पक्षाचं मिशन लोटस :

गोव्यात ऑपरेशन लोटस ची हालचाल सुरू असल्याची चर्चा असून विधानसभा निवडणुकीला पाच महिने झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त असलेल्या काँग्रेसला गोव्यात मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

गोव्यात भाजपचे प्रधान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी अजब दावा केला आहे. काँग्रेसचे आकरापैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा त्यांनी म्हटलं आहे. गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 आहेत. मात्र सध्या काँग्रेसकडे 18 आणि भाजपचे 20 आमदार आहेत.

दरम्यान, जुलै २०१९मध्ये काँग्रेसचे दहा आमदार एकत्र भाजपमध्ये दखल झाले होते. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. अशातच काँग्रेसला गोव्यामध्ये मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे. भारत जोडो यात्रेचा आठवा दिवस आहे. तसेच कन्याकुमारी ते काश्मीर असा हा प्रवास आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!