Share

Sandeep Deshpande | “बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे”

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याआधी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना एक वेगळीच दिशा मिळाली असल्याचं दिसून येतं आहे. याचमुद्यावर मनसे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

संदीप देशपांडे यांचे वक्तव्य-

दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नसून, बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडत आहेत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो याला फार महत्त्व नसल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

जे कोणी दसरा मेळावा तुम्ही घेणार आहेत. तो मेळावा बाळासाहेबांचा विचारांचा मेळावा म्हणून ओळखला जातो. दिवस आणि स्थळ महत्वाचं नसून जे कोणा हा मेळावा घेऊ इच्छित आहेत. त्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत का?, ते बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकतात का?, हा प्रश्न महत्वाचा आहे. मला असं वाटतं ज्याप्रकारे सन्माननीय राज ठाकरे आज ज्याप्रकारे बाळासांहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत. त्यांचे विचार पुढे नेण्याची क्षमता फक्त राज साहेबांकडेच असल्याचं, देशपांडे यांनी म्हटलं आहे.

तसेच, संदीप देशपांडे यांना गुजरातला गेलेल्या वेदांता प्रकल्पावर विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, वेदांता सारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!