🕒 1 min read
मुंबई : वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. यावरून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरून त्यांच्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला का गेला हे समोर आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीबरोबर प्रकल्प बाबत चर्चा केली होती.
महाराष्ट्रात 26 जुलै 2022 रोजी सत्ता बदल झाली यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीबरोबर प्रकल्प बाबत चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. मात्र वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प नेमका महाराष्ट्रातील गुजरातला का गेला याचं कारण जाणून घेऊयात.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का गेलाः
गुजरात हे सेमीकंडक्शन धोरण असलेलं एकमेव राज्य आहे. त्यामुळे या कंपनीने गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे. याच एका कारणामुळे महाराष्ट्राच्या हातून हा प्रोजेक्ट गेला असल्याचं म्हटलं जात आहे. गुजरातने सेमी कंडक्शन धोरण बनवलं, असं धोरण बनवणारं देशातील हे एकमेव राज्य असून या धोरणा अंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रॉनिक मिशन स्थापन करण्यात आलं. या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या मान्यता बजेटमध्ये घेतल्या जातील.
गुजरात सरकार गेल्या फेब्रुवारीपासून गुंतवणुकीसाठी तयार होतं. या पॉलिसीमध्ये सेमीकण्डक्टर बनवणाऱ्या कंपन्यांनी गुजरात शी संपर्क साधला होता. शिंदे सरकार स्थापन होण्याच्या तीन दिवस आधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर या कंपनीची शेवटची बैठक झाली होती. मंगळवारी सह्या करण्याची औपचारिक प्रक्रिया गुजरात मध्ये पार पडली.
अमोल मिटकरी यांची प्रतिक्रीयाः
दरम्यान, या कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटींची सवलत दिली होती. मात्र गुजरात सरकारने 29 हजार कोटींची सवलती तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरात मध्ये शिंदे सरकारने घालवला लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले यामुळे राज्यपाल पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहा यांनी यांना आपण नक्कीच खुश केलं असे राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्याः
- Jitendra Awhad | “ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला…” ; वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
- Credit Score : क्रेडिट कार्ड वापरता? ही बातमी वाचाचं! फायदे आणि तोटे जाणून घ्या…
- Amol Mitkari | शिंदे-फडणवीस सरकारने लाखो हिंदू तरुणांना बेरोजगार केले – अमोल मिटकरी
- MNS | “वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा?, याबाबत चौकशी करा” मनसेची मागणी
- Vedanta Foxconn | शिंदे-फडणवीस सरकार झोपले होते का? वेदांत-फॉक्सकॉन कंपनीवरुन घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
