🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजप सोडत असल्याची घोषणा केली आहे. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. अस म्हणताच एकनाथ खडसे यांचा कंठ दाटून आला. तर एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला, पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला असा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
छळाला मर्यादा नव्हत्या पण मी सहन केले अस एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तर भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला अशी खंत एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.
महत्वाच्या बातम्या
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊंचे पक्ष सोडणं धक्कादायक आणि दुःखद – मुनगंटीवार
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
