🕒 1 min read
मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची औपचारिकता उद्या पूर्ण केली जाणार आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल. प्रवेशानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे. त्यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात कालपासून तयारीला सुरुवातही झाली होती.एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे.खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे.’नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत.एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे.खड्सेंचा मान राखण्याचा पूर्ण प्रयत्न राष्ट्रवादी करेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गरज पडलीच तर शिवसेनेशी चर्चा करून कृषी खाते देखील दिले जाईल अशी चर्चा आहे.
दरम्यान,पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, खडसेंसारख्या नेत्याने पक्षाची 40 वर्षं सेवा केली आहे. त्यांनी जाऊ नये असं मला सतत वाटायचं,अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.हे धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांच्या मनात खंत होती, माझ्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटायचं, तो चर्चेतून संपेल असं वाटायचं, असंही मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
- जाणून घ्या नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर कोणतं मंत्रिपद मिळू शकतं?
- प्रकाशजीच असं बोलू शकतात, आंबेडकर नाही ; काकडेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- गब्बरची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबच्या विजयामुळे इतर संघांची चिंता वाढली
- खडसेंवर भाजपमध्ये मोठा अन्याय झाला आहे – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
