Share

फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

जयंत पाटील यांनी याची अधिकृत घोषणा करतानाच भाजपसाठी आणखी एक धक्कादायक असं सूचक वक्तव्य केलं आहे. फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. याआधी मंत्री नवाब मलिक व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आमदार फोडाफोडीवरून शाब्दिक चकमक झाली होती.

भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट करतानाच निवडणुकांपुर्वी गेलेले अनेक नेते देखील घरवापसी करणार असल्याचं ते म्हणाले होते. चंद्रकांत पाटलांनी हे वृत्त तात्काळ फेटाळले असले तरी आज जयंत पाटलांनी पुन्हा यासंबंधी विधान केल्यामुळे आता भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!