मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ‘नाथाभाऊंनी जाऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. ते जाणार असल्याचं वृत्त समजताच पक्षातर्फे संवादाची प्रक्रिया सुरु केली होती. ते जाणार नाहीत अशी आमची आशा होती. अजूनही मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
खडसेंना मंत्रिपद?
सद्या गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. खडसेंच्या मान राखण्याचा पूर्ण प्रयत्न राष्ट्रवादी करेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गरज पडलीच तर शिवसेनेशी चर्चा करून कृषी खाते देखील दिले जाईल अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊंचे पक्ष सोडणं धक्कादायक आणि दुःखद – मुनगंटीवार
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

