Share

खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: 

मुंबई-  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची औपचारिकता उद्या पूर्ण केली जाणार आहे.

अशातच गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,माजी उप नगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अशोक गुप्ता यांनी काल शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आ. सहसराम कोरोटे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, गोंदिया जिल्हा अध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान व जिल्हा सरचिटणीस ऍड. योगेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अशोक गुप्ता यांनीकॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला.

गुप्ता यांच्यासह, राजकुमार पटले, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश देवाधारी, पंचायत समिती सदस्य विजय उके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, चुनेश पटले, नरेंद्र चिखलोंडे, गोपाल अजनीकर, आसीफ अहमद अली, योगेश भेलावे, महेश पाचे, सचिन मेश्राम, मनिष लांजेवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत होईल असे थोरात म्हणाले.

दरम्यान,उद्या एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!