Share

‘ठाकरे सरकारमध्येच शिक्षण सम्राट बसल्याने शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे हित खुंटीवर टांगलेय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 28 मेचा यासंदर्भाताल अध्यादेश न्यायालयाने रद्द करत अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश दिले आहेत.

यावरून आता ठाकरे सरकारवर भाजपने हल्लाबोल केला असून न्यायालयाने फटकारल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ‘ठाकरे सरकारमध्येच शिक्षण सम्राट बसल्याने शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे हित खुंटीवर टांगले असून सातत्याने या सम्राटाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. शाळा सुरू करण्यापासून परीक्षांपर्यंत आणि प्रवेशापासून शिकवण्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर न्यायालयाने चपराक लगावल्याखेरील ठाकरे सरकारच्या शिक्षण खात्याचा गाडा पुढे सरकतच नाही,’ असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

यासोबतच, ‘दहावी-बारावी परीक्षांचा घोळ सरकारच्या धोरण लकव्यामुळेच वाढल्यानंतर सीईटीबाबतही ठाकरे सरकार न्यायालयाच्या निकालातूनच सुटकेचा मार्ग शोधत होते. सीईटीचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेवर चाचपडणे सुरू झाल्याने अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचीही वाताहत होण्याची भीती आहे, शिक्षण खात्याच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार उदासीन असल्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला असून विद्यार्थी-पालक, हवालदील आणि सरकार दिशाहीन असे चित्र राज्यात निर्माण झाले आहे शिक्षणसंस्थाचालकांच्या हितासाठी तत्परतेने हालचाली करणारे सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे साफ दुर्लक्ष करत असून अकरावी प्रवेशातील दिरंगाईतून हे स्पष्ट झाले आहे,’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!