🕒 1 min read
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंसाठी एक विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. जेथे पोस्टरवर खेळाडूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत होता. मात्र, या पोस्टरवरील खेळाडूंचे फोटो पीएम मोदींच्या तुलनेत खूपच लहान होते, हे पाहून सोशल मीडियावर या पोस्टरची बरीच चर्चा सुरू झाली.
यावरूनच माजी आयएएस सूर्यप्रताप सिंह यांनी ऑलिम्पिक विजेत्यांच्या सत्कार समारंभात असलेल्या पोस्टरवर जोरदार टीका केली आहे. पोस्टरवर पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो पाहून सूर्यप्रताप सिंह म्हणाले, ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल. तर दुसरीकडे काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला आहे.
भारत पहुँचने के बाद #Olympics मेडल विजेताओं का सम्मान कुछ यूँ हो रहा है pic.twitter.com/CfYMn9eI5d
— Vinod Kapri (@vinodkapri) August 9, 2021
मेडल मोदी जी जीतकर लाये है? pic.twitter.com/taUykaLCuU
— Srinivas BV (@srinivasiyc) August 9, 2021
Everything is PR PR is everything ???????? pic.twitter.com/zO6IQjkdkL
— Vijender Singh (@boxervijender) August 9, 2021
Everything is PR PR is everything ???????? pic.twitter.com/zO6IQjkdkL
— Vijender Singh (@boxervijender) August 9, 2021
लेखक अभिसार शर्मा यांनीही एक पोस्ट केली ज्यात त्यांनी पीएम मोदींवर विनोद केला आणि म्हटले, ‘गजब महिमा है प्रभु की.’ तर फिल्ममेकर विनोद कापड़ी याने देखील ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला, ‘भारतात पोहोचल्यानंतर अशा प्रकारे पदक विजेत्यांचा आदर केला जातो. तर माजी ऑलिम्पिकपदक विजेता भारताचा मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने देखील या पोस्टरवर टीका केली आहे.
भारतीय ऑलिम्पिक चॅम्पियन्सचा सन्मान सोहळा नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे स्टेजवरील पोस्टरवर खेळाडूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो दिसून आला. याच पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तसेच काहींकडून या पोस्टवर टीका देखील केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी
- घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
