Share

Keshav Upadhye : “अडीच वर्षे सत्तेत असताना ओबीसीची…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ घोषणेनंतर भाजपचा टोला

Published On: 

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला असल्याचे  म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टोला लगावला आहे.

“अडीच वर्षे सत्तेत असताना ओबीसी समाजाची आठवण झाली नाही. ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास मविआ सरकारच कारणीभूत होते. आता मात्र २७ टक्के आरक्षण देण्याच्या गप्पा मारत आहात.”, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. असा निर्धारही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!