नवी दिल्ली : मागील काही आठवड्यांपासून राज्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी आणि केंद्रीय मंत्र्यांशी भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत विविध नेते हे दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत.
आता चर्चा मात्र केंद्रीय मंत्री अमित शाह आणि काँग्रेसमधून भाजपात उडी घेतलेल्या दोन दिग्गज पाटलांच्या भेटीची होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांची भेट होऊ शकली नसली तरी या दोन नेत्यांनी त्यांना गाठले. भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा अद्यापही सुरु असून आता या भेटीमुळे वेगळे तर्क काढले जाऊ लागले आहेत. पावसाळी अधिवेशनाचे कारण देत अमित शाह यांची भेट झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
मात्र, देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे दोन नेते अमित शाह यांना भेटण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेस मध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना खास मान असायचा. मात्र, या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणूक देखील हरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला. तर, विखे पाटील यांच्या चिरंजीवांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली.
सुजय विखे पाटील हे खासदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले. तर, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारंपरिक मतदारसंघातून विजय राखला. मात्र हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोघेही भाजपात आल्यानंतर मोठ्या जबाबदारीपासून वंचित आहेत. आता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे साईडलाईनच्या जागेतून उठवून भाजपात मध्यभागी जागा मिळणार का हे येत्या काळातच समजेल.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र


