🕒 1 min read
मुंबई: मंगळवारी १० जुलैरोजी राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आज या विधेयकासंदर्भात लोकसभेत चर्चा केली जाणार आहे. या विधेयकावर बोलण्यासाठी आपल्याला संधी द्यावी अशी मागणी भाजपाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आपल्याला राज्यसभेमध्ये मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात बोलण्याची संधी द्यावी असे पत्र उपराष्ट्रपतींना पाठवल्याचे संभाजी राजेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी जे जे वंचित आहेत त्यासर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडली आणि तेच आमचं म्हणणं आहे. अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली आहे.
राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार परत बहाल करणारे १२७ वे घटनादुरूस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर होत आहे. देशात सर्वप्रथम आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा वंशज व मराठा समाजाचा घटक म्हणून या विधेयकावर मत मांडणे मी माझे कर्तव्य समजतो.
… pic.twitter.com/rhtJ4vjcJs— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 11, 2021
मंगळवारी, विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्रकुमार यांनी आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून संविधानाच्या दृष्टीने त्यावर सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे म्हटले. दरम्यान या विधेयकाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
