Share

Gulabrao Patil | उद्धव ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू नेता जाणार शिंदे गटात? गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातील विश्वासू आणि महत्वाचे मानले नेते जाणारे एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला. त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी देखील शिंदेंची साथ दिली. यानंतर शिंदेंनी शिवसेना पक्षावर दावा केल्यामुळे पक्षात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले. त्यामुळे आपला गट किती भक्कम आहे हे दाखवण्यासाठी अनेक दाव केले जात असतानाच शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा :

उद्धव ठाकरेंचा विश्वासू नेता मिलींद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. धुळे येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

यादरम्यान, गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे, मग चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तो देखील यांना सोडून आला, यांनी आता टीका करायची तरी कशी?, थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर देखील येत आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मिलींद नार्वेकर होते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात :

दरम्यान, बंड केल्यानंतर देखील मिलींद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. एवढंच नाही तर शिंदे गणेश उत्सावावेळी नार्वेकरांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं, त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!