मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधक एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारवर जोकदार टीका करताना दिसत आहे. राज्यातील राजकरणात एकमेंकांवरचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विटद्वारे टीका केली आहे. यासोबतच त्यांनी एका वृत्तपत्राचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारला टोला :
सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या फोटमध्ये सत्तांतर नंतर महाराष्ट्र कसं शांतमय झालं, असं शीर्षक दिलं आहे. तसेच ना इडीच्या चौकशी, ना सोमय्यांची किटकीट, ना फडणवीसांचे आरोप, ना भौग, ना हनुमान चालिसा, ना मंदिर, ना मशीद, ना हिंदुत्व, ना मुसलमान, सगळं कसं मस्त मस्त चाललंय ना.. सारं कसं शांत शांत, सोमय्या शांत, दरेकर शांत, फडणवीस शांत, चंद्रकांत पाटील शांत, दानवे शांत, प्रसाद शांत, शेलार शांत, राज शांत, राणा शांत, ३ राणे शांत, गुणरत्न शांत, राजभवन शांत, पडळकर शांत, सदाभाऊ शांत, राऊतही शांत आणि मीडियाही शांत जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी, पण पब्लिकही शांत.. इतकेच काय ED पण शांत सगळं कसं ओक्के!, असं शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहण्यात आलं आहे.
राज्यातील राजकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी होत आहेत. मात्र, सत्तांतर होणं, ही राजकरणातील सर्वात खळबळजनक घडामोड होती. यानतर महाराष्ट्राचं वातावरणच बदललं. याचपार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी ही टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | जे.पी. नड्डा यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार, म्हणाल्या…
- Gulabrao Patil | उद्धव ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू नेता जाणार शिंदे गटात? गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य
- Chhagan Bhujbal | धमकवल्याप्रकरणी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल
- Kangana Ranaut | कंगणाची राजकारणात एन्ट्री! एकनाथ शिंदेंची घेणार भेट
- Chandrakant Khaire | दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरून चंद्रकांत खैरेंचे शिंदे गटावर आरोप, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

