Share

Amol Kolhe | … म्हणून अमोल कोल्हेंनी घेतली अमित शहांची भेट, चर्चांना उधाण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मराठी मालिका, छत्रपची संभुराजे यातुन प्रसिद्ध झालेले अभिनेता डाॅ. अमोल कोल्हे यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवप्रताप गरूडझेप, असं या चित्रपटाचं नाव आहे. अशातच अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट देखील आहे.

अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शहा यांची भेट :

नुकतीच केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा यांची भेट घेतली व विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली. तसेच दिल्ली येथे ‘गरूडझेप’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंतीही केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून घेत या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या ऐतिहासिक घटनेवर शिवप्रताप गरूडझेप हा सिनेमा आधारित आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, हाच उद्देश!, असं अमोल कोल्हेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, झालेल्या भेटीची माहिती देत असताना, या भेटीत उत्तर व दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला संस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला संस्कार समजावून सांगणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ प्रकल्प व सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्यसेवा देणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प यासंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास मला माननीय गृहमंत्री महोदयांनी यावेळी दिला. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल माननीय गृहमंत्री महोदयांना मनःपूर्वक धन्यवाद!, असं कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!