मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, अजय देवगन, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पहिल्याच दिवसापासुन प्रेक्षाकांचा देखील भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटानं 800 कोटींची कमाई केली असून आता या चित्रपटानं आमिर खान आणि रजनीकांत यांच्या चित्रपटाचा देखील रेकॉर्ड तोडले आहेत.
चक्क 12व्या दिवशी ‘RRR’ ह्या चित्रपटाने तेलगु बॉक्स ऑफिस मध्ये ५ कोटी, तर ह्या १२ दिवसात तमिळ भाषेत ६५ कोटी आणि कन्नड भाषेत ७५ कोटिंची कमाई केली आहे. तर आत्ता पर्यंतचं तेलगु बॉक्स ऑफिसचं कलेक्शन ३५३ कोटींपेक्षा ही जास्त झाला आहे. ह्या चित्रपटाने हिंदी भाषेतील आवृत्ती मध्ये देखील १२ व्या दिवशी ६ कोटींची कामाई केली आहे. आणि हिंदी पट्ट्यातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून सर्व आवृत्त्यांमधून जगभरात ‘RRR’ ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने तब्बल ९३५ कोटींची कमाई केली आहे.
‘RRR’ हा एस एसचा आणखी एक एपिक पिरियड अॅक्शन ड्रामा आहे. चित्रपटाची कथा राजामौली यांनी लिहिली आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी अल्लुरी सीताराम राजू (राम चरण) आणि कोमाराम भीम जुनीअर एन टी आर या दोन भारतीय क्रांतिकारकांच्या काल्पनिक कथेबद्दल आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या त्यांच्या लढ्याबद्दल सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :


