अहमदनगर: शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (narendra modi) भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावरच आता उप मुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी संभाव्य कारण सांगितले आहे.
बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात आम्ही साहेबांना बोललो होतो, त्यानुसार त्यांनी ही भेट घेतली असावी. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या बारा आमदारांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. याबाबत आधीही अनेकदा चर्चा आणि भेटी झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे साहेबांनी थेट मोदींची भेट घेऊन यावर चर्चा केली असावी.असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. मात्र राज्यातील घडामोडीनुसार ही भेट महत्वाची मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
“एक दिवस रोनाल्डो म्हणून झोपेतून उठलो, तर पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करेन”, विराट कोहलीचं वक्तव्य चर्चेत!
भ्रष्ट किरीट सोमय्या उत्तर द्या! राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांनंतर मनीषा कायंदेंची मागणी
“नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न” – फडणवीसांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
“चित्रपटात काही धर्मनिरपेक्ष लोक…” द कश्मीर फाइल्सवर नितीन गडकरींचे विधान चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

