मुंबई : एप्रिल महिन्यात काही अतिशय मनोरंजक चित्रपटांची रेलचेल असते. Jersey, KGF: Chapter 2 पासून ते Heropanti 2 पर्यंत हे सर्व चित्रपट एप्रिलमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहेत.
अभिनेता अभिषेक बच्चन देखील आपल्या नववर्ष्यातल्या पहिल्या चित्रपटाची तयारी करत आहेत. त्याचा चित्रपट ‘दसवी’ हा चित्रपट येत आहे. ज्युनियर बच्चन या चित्रपटात एका निरक्षर राजकारण्याची भूमिका करताना दिसणार आहे जो तुरुंगात असताना दहावीची परीक्षा उत्तीर्ण करण्याचे आव्हान स्वीकारतो. तुषार जलोटा दिग्दर्शित ‘दसवी’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
त्यांनंतर अभिनेते शाहीद कपूर यांचा ‘जर्सी’ चिटपट बैसाखीच्या शुभ मुहूर्तावर १४ एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तो बॉक्स ऑफिसवर ‘KGF: Chapter 2’ सोबत जोरदार टक्कर देणार आहे.
तसेच ‘KGF : CHAPTER 2’ अखेर बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवण्यासाठी सज्ज आहे आणि १४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे आणि शाहिद कपूरच्या ‘जर्सी’शी टक्कर होणार आहे. ‘KGF’ च्या सुपर यशानंतर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिक्वेलसाठी संजय दत्त आणि रवीना टंडन सारख्या बॉलीवूड कलाकारांना देखील मुख्य भूमिकेत घेतले आहे.निःसंशयपणे हा वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अशेच ‘RUNWAY 34’ आणि ‘HEROPANTI 2’ सारखे चित्रपट देखील यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :


