मुंबई: आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे म्युझियममध्ये रूपांतर केले पाहीजे अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतली होती. यातही विशेषकरून भाजप नेते किरीट सौमय्या यांनी एक मोहीम सुरु केली. या मोहमेंतर्गत लोकवर्गणीतून २०० कोटी रुपये जमा करून राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द करू,असे सांगितले गेले. मात्र किरीट सोमय्यांनी ही वर्गणी राज्यपालांकडे दिली नसल्याचा खुलासा आरटीआयच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे आयएनएस विक्रांतच्या नावे पैसे गोळा करून देशातील जनतेच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी खेळ केला गेला, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तापसे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.
तसेच संरक्षण खात्याच्या युद्धनौकेशी संबंधित गोळा केलेले पैसे नेमके गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असे राऊत यांनी म्हटले आहे. विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 : “त्याला टीम इंडियाचा कॅप्टन बनायचंय…”, शोएब अख्तरनं कोणाबद्दल दिलंय हे मत? नक्की वाचा!
शरद पवार मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान; अजित पवारांनी सांगितले संभाव्य कारण
मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम – चार दिवसात भोंगे हटवा अन्यथा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

