मुंबई : कोलकाता नाइट रायडर्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या रुपात नवा कप्तान लाभला आहे. याआधी श्रेयसने दिल्ली कॅपिटल्सचे यशस्वी नेतृत्व केले होते. त्याने संघाला आयपीएल फायनलपर्यंत पोहोचवले होते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरलाही श्रेयसचे नेतृत्व आवडते. त्याने अय्यरबाबत मत दिले.
यापूर्वी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आयपीएल २०२२ चा अंतिम सामनाही खेळला होता. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर २०१८मध्ये त्याने जबाबदारी स्वीकारली. अय्यरच्या नेतृत्वावर शोएब अख्तर म्हणाला, ”अय्यर आपल्या कर्णधारपदाने आयपीएलवर दबाव आणत नसून, तो टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी दावा करण्याच्या तयारीत आहे. त्याला भारतीय संघात आपले स्थान पक्के करायचे आहे आणि नेतृत्वही करायचे आहे. तो आपली क्षमता सिद्ध करत आहे. त्याने सतत धावा करत संघाचे नेतृत्व केले पाहिजे आणि भविष्यात तो एक मोठा ब्रँड बनेल याची मला खात्री आहे.
खांद्याच्या दुखापतीतून परतल्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियाकडून खेळताना अनेक शानदार खेळी खेळल्या. मात्र आयपीएल २०२२मध्ये त्याची बॅट अजूनही शांत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- शरद पवार मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान; अजित पवारांनी सांगितले संभाव्य कारण
- मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम – चार दिवसात भोंगे हटवा अन्यथा…
- IPL 2022 : आयपीएलमध्ये खतरनाक गोलंदाजी करणाऱ्या ‘या’ भारतीय खेळाडूवर रोहितचा डोळा; T20 विश्वचषक संघात लागू शकते वर्णी!
- “एक दिवस रोनाल्डो म्हणून झोपेतून उठलो, तर पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करेन”, विराट कोहलीचं वक्तव्य चर्चेत!
- भ्रष्ट किरीट सोमय्या उत्तर द्या! राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांनंतर मनीषा कायंदेंची मागणी
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


