🕒 1 min read
मुंबई : जवळपास १० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केलं. मेट्रो कारशेडचा मुद्दा देखील त्यांनी मांडला. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून परत एकदा राजकारण चर्चेत येणार आहे. त्यामुळे माझा राग मुंबईवर काढू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझा चेहरा आज पहिल्यांदा तुम्हाला पडलेला दिसत असेल. मला दुःख झालं आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. कांजुरचा प्रस्ताव आहे त्यात आमचा काही अहंकार नाही. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे स्पष्ट केले आहे. अडीच वर्षांपूर्वी अमित शहा यांनी दगा दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा अस ठरलं होतं असं ठाकरे म्हणाले.
त्याबरोबरच वरतीही तुमचं सरकार आहे, त्यामुळे मुंबईची जमीन मुंबईच्या हितासाठी वापरा. कांजूरला गेल्यानंतर ती मेट्रो थेट बदलापूर पर्यंत जाईल असा विचार करून तो निर्णय घेतला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
