Share

‘कर्जमाफी नको! तर कर्जमुक्ती हवी, शेतकरी गुन्हेगार आहे का ?’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेवर आहे. या यात्रेच्या मध्यमातून आदित्य ठाकरे जिल्हानिहाय मतदारांशी संवाद साधत आहेत. शेतकरी , विद्यार्थी महिलांना आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष्य केले आहे. तर त्यांच्या अडचणी जाणून घेण्यास विशेष प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नको! तर कर्जमुक्ती हवी असा नारा दिला आहे. औरंगाबाद येथील यात्रेत आदित्य ठाकरेंनी विजयी मेळावा घेत. नागरिकांशी संवाद साधला आहे.

शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे. त्यामुळे तो कर्जाच्या बोज्याखाली अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी, कारण गुन्हेगाराला माफी दिली जाते. शेतकरी हा गुन्हेगार नाही त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्ती हवी,असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा भगवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, तुमचे आशीर्वाद हवे आहेत. नवमहाराष्ट्रासाठी आपण सारे जण जातपात, धर्म, राजकारण सोडून एकत्र येऊया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच जनआशीर्वाद यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्राच आहे,असे ते म्हणाले.

दरम्यान शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाले आहेत. तर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढली आहे. लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढली आहे. त्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसादही मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!