टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. आता याबाबत कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, येणारी कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही, असेही गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मुलगा विक्रांत जाधव याच्यासाठी गुहागरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मी मागितले आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. एका वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
तुम्हाला रसायनांचा विकास हवा आहे की आम्ही केलेला विकास पाहिजे ? – सुळे
सत्ता असताना काही केलं नाही, आता कसल्या यात्रा काढता ?


