टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांच्या तारखा अनंत चतुर्दशीपर्यंत जाहीर होणार असल्याच सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आता उमेदवारांच्या चाचपणीला आणि मुलाखतीला सुरवात केली आहे. भाजप पक्षानेही राज्यात जोरदार मोर्चेबांधणी केली असून जिल्हानिहाय उमेदवारांच्या चाचपणीला सुरवात केली आहे. तर उमेदवारी देण्याच्या निकषावर भाजप नेते आणि वस्त्रोद्याग व पणनमंत्री राम शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
मुलाखत दिलेली नसेल आणि निवडून येण्याची खात्री असेल, तर अशा व्यक्तीलाही उमेदवारी मिळू शकते, असे राम शिंदे सोलापूर येथे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. यावरून त्यांनी हे सूचक विधान केले. राम शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील एकूण ११ मतदारसंघांत ९५ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखत दिली म्हणजे उमेदवारी मिळेल, असे होत नाही. मुलाखत न घेतासुद्धा जे लोक बाजूला राहिलेत त्यांनाही उमेदवारी मिळू शकते. पण त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट हवे.
दरम्यान विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजप पक्षाने रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप – सेना युतीला भरघोस यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील भाजप सेना युतीचे पारडे जड असेल असा अंदाज राजकीय तज्ञांनी वर्तवला आहे.
- आर्थिक मंदीबाबत राज ठाकरेंचं भाकीत ठरलं खर !
- सरकारला दिल्या जाणाऱ्या पैशामुळे RBIची विश्वासहर्ता कमी होणार नाही : निर्मला सीतारामन
- दिलिप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा दिला राजीनामा
- उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला पेपर मी सध्या फोडणार नाही : आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

