Share

राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी खासदाराने दिली भाजप प्रवेशाची कबुली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजप प्रवेश करणार असल्याची कबुली खुद्द महाडिक यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत १ सप्टेंबरला धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्टला महाजनादेश यात्रे निमित्त महाराष्ट्रात येणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत धनंजय महाडिक भाजपात प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे.

दरम्यान, धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. तरी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. मात्र हा विश्वास फोल ठरला आणि धनंजय महाडिक यांना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासमोर लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता.

धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी सोडणारे पहिले नेते नाहीत. त्यांच्यापूर्वी वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. तसेच आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते राणा जगजीत हे पक्ष सोडणार आहेत. रामराजे निंबाळकर हेही राष्ट्रवादी सोडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत अजूनच वाढ झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!