Share

Shivsena: शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस; पण आदित्य ठाकरे यांना नाही

Published On: 

मुंबई : मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या १४ आमदारांच्या निलंबनाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. यानुसार या १४ आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना यामध्ये नोटीस पाठवण्यात आली नाही. यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या १४ आमदारांची आमदारकी धोक्यात आली आहे. पक्षाने काढलेला व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यताही आहे.

महाराष्ट्रातील नवीन शिंदे सरकारने फ्लोर टेस्ट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडली. तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी उद्धव गटाचे शिवसेनेच्या वतीने प्रतोद सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी करत विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश जारी केला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होणार असल्याचे संकेत दिल होते. आज विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे गटातील १५ आमदारांवर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले होते.

मात्र, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना अपत्रतेची नोटीस बजावली नाही. याबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आता आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. काल फ्लोअर टेस्ट पूर्वी शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला होता. शिंदे सरकारला फ्लोअर टेस्टमध्ये १६४ मते मिळाली. तर विरोधकांना ९९ मते मिळाली, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!