Share

राज्यपाल कोश्यारींवर ‘या’ अपक्ष आमदाराची बोचरी टीका; म्हणाले,’एक नंबरचा बोगस राज्यपाल…’

Published On: 

मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. तर आज शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. काल १६४ मते भाजपच्या सभापती उमेदवाराच्या बाजूने पडली आणि आजही शिंदे यांना तेवढीच मते पडली. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

अपक्ष आमदार भुयार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपाल कोश्यारींवरील नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ‘हे राज्यपाल फार विचित्र माणूस आहे. हे राज्यपाल कुठून आले, कसे आले, कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती. जेवढे काही राज्यपाल महाराष्ट्राला स्वातंत्र्यापासून लाभले आहेत, त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेलं बरं.’ अशा शब्दांमध्ये भुयार यांनी राज्यपालांवर बोचरी टीका केली.

अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते
दरम्यान सभागृहातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तर नावे सर्वांना समजली. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीतून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी राष्ट्रवादीतील जयंत पाटील तसेच अजित पवार व इतर काही नेत्यांची नावे समोर आली होती. मात्र आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!