Share

ENG vs IND : मॅच रोमांचक स्थितीत; चौथ्या दिवसअखेर रूट-बेअरस्टोमुळं इंग्लंडचं कमबॅक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी कर्णधार जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. यजमानांनी चौथ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात ३ बाद २५९ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी अजूनही ११९ धावांची गरज आहे तर भारताला आणखी ७ विकेट्सची आवश्यकता आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला आणि यजमानांना विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य दिले.

चौथ्या दिवस अखेर रुट ७६ तर बेअरस्टो ७२ धावांवर नाबाद आहे. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये १५० धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. अलेक्स लीस (५६) आणि झॅक क्रॉली (४६) यांनी शतकी सलामी दिली. ओली पोप खातेही न उघडता तंबूत परतला. या डावात भारतासाठी बुमराहने दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक –

  • नाणेफेक – इंग्लंड (गोलंदाजी)
  • भारत पहिला डाव – सर्वबाद ४१६ (ऋषभ पंत १४६ धावा, रवींद्र जडेजा १०४ धावा, जेम्स अँडरसन ६०/५)
  • इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद २८४ (जॉनी बेअरस्टो १०६ धावा)
  • भारत दुसरा डाव – सर्वबाद २४५ (चेतेश्वर पुजारा ६६, ऋषभ पंत ५७, बेन स्टोक्स ३३/४)

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!