मुंबई : भारताचा फलंदाज दिनेश कार्तिक याने या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी अत्यंत दृढनिश्चयी असल्याचा खुलासा केला आहे. पुन्हा भारतीय संघाचा भाग झाल्याचा आनंद असल्याचेही कार्तिकने सांगितले. आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर ३७ वर्षीय दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने आयपीएल २०२२मध्ये १६ सामन्यांमध्ये १८३.३३च्या स्ट्राइक रेटने ३३० धावा केल्या.
दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २७ चेंडूत ५५ धावा केल्या. हार्दिक पंड्याशी संवाद साधताना, कार्तिकने आपली कारकीर्द कशी हाताळली याबद्दल प्रांजळपणे सांगितले. तो म्हणाला, ”मी ठरवले होते की मला यंदाचा विश्वचषक खेळायचा आहे. माझ्या आयुष्यात हे खूप महत्त्वाचे आहे कारण मी खूप दिवसांपासून खेळत आहे. मला माहीत आहे, की संघाबाहेर राहणे कसे वाटते आणि त्याच वेळी भारतीय संघासाठी खेळणे किती मौल्यवान आहे हे मला माहीत आहे. मला काहीतरी खास करायचं आहे.”
दिनेश कार्तिकने कबूल केले की आयपीएल २०२२मध्ये आरसीबीमध्ये फिनिशर म्हणून भूमिकेने त्याला खूप मदत केली. कार्तिक म्हणाला, ”आरसीबीने मला ते व्यासपीठ दिले ही भाग्याची गोष्ट आहे. शेवटी मला या भूमिकेचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. यासाठी मी खूप सराव केला. आता मी येथे आलो आहे, मला अशी व्यक्ती व्हायची आहे जी भारतीय संघाला ते कठीण सामने जिंकण्यासाठी मदत करेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

