सुरत (गुजरात) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना दणका दिला आहे. काल रात्रीपासून त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. ते अंदाजे १३ आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यांच्या ट्विटवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना ट्विटमध्ये काय म्हणायचं आहे याबाबत ‘समझनेवाले को इशारा काफी’ एवढंच मी म्हणेल. आत्ता कुठलंही मत व्यक्त करणं थोडं घाईचं होईल. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ अशी भाजपाची स्थिती आहे. काल रात्री अचानक असा मेसेज आला की काहीजण असे नॉट रिचेबल आहेत. त्यातून हळूहळू विषय पुढे चालला आहे.”
एकनाथ खडसे यांचं काय होतं ट्विट –
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे ट्वीट एकानाथ शिंदे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

