Share

“फडणवीसांना कोणत्याही कटात अडकवण्याचा संबंध नाही”- दिलीप वळसे पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्याप्रकरणात काल जबाब नोंदवण्यात आला. सुमारे दोन तास फडणवीसांची चौकशी केली गेली. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत “या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा” आरोप फडणवीसांनी केला. त्यामुळे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले.

“फडणवीसांना पाठवण्यात आलेले प्रश्न मी पाहिले नाही आणि उत्तरही पाहिलं नाही. एसआयटीतील डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. तपास करताना सर्कल पूर्ण करावे लागते. पोलिसांनी काहीही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे. मीही कायदा शिकलो पण कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालाही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. विरोधी पक्षनेत्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही”, असे उत्तर वळसे पाटील यांनी विधानसभेत दिले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!