औरंगाबादः मुस्कान खानचा सत्कार समारंभ औरंगाबादमध्ये आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता आयोजित केला आहे. शहरातील आमखास मैदानावर या सत्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली असून पोलीस आणि वंचित आघाडी असा संघर्ष आज पहायला मिळणार असण्याची दाट शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय ?
ही घटना आहे कर्नाटक मधील. कर्नाटकमध्ये एक तरुणी कॉलेजमध्ये हिजाब घालून प्रवेश करते. ती प्रवेश करताच काही तरुण तिच्याकडे घोषणाबाजी घेऊन येतात. या तरूणांनी भगवी कपडे घालून तरूणीच्या समोर “जय श्री रामच्या” घोषणा दिल्या. हे तिच्या लक्षात येताच तिनेही तरूणांना प्रत्युत्तर म्हणून “अल्लाहू अकबरच्या” घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व यानंतर देशातलं वातावरण अत्यंत तापल होतं.
तेव्हा राज्य सरकारने कर्नाटकमधल्या अनेक शाळा बंद केल्या. कारण परिस्थिती गंभीर चिघळण्याची शक्यता व्यक्त केली होती व चिघळली देखील होती. या भीतीपोटी व सावध राहण्यासाठी अनेक पालकांनी मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणावेळी खूप जास्त लोकांनी निषेध नोंदविला होता तर काहींनी या प्रकरणाला समर्थन केले होते.
महत्वाच्या बातम्या –


