🕒 1 min read
बीड : मुंडे बहीण-भावात सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड जिल्ह्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांना टोला लगावला होता. त्यावरून खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली, असे त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे.
प्रीतम मुंडेंच्या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना धनंजय मुंडे म्हणाले की,‘कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या’, असे आव्हान मुंडेंनी केले आहे.
दरम्यान, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
- “…हे देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना मान्य आहे का?”, संजय राऊतांचा सवाल
- IND vs SL: ‘जेंटलमॅन्स गेम’ कोहली आणि द्रविडने केले शेवटचा सामना खेळणाऱ्या लकमलचे अभिनंदन ; व्हिडीओ व्हायरल
- “…राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न”, नाना पटोलेंची ट्वीट करत माहिती
- “गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
