पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (१३ मार्च) रोजी पुण्यातील वडगावशेरीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना अजित दादांचा अनोखा अंदाज बघायला मिळाला. अजित दादांचे भाषण रंगात आले असतानाच ‘अजान’ चा आवाज सभेत गुंजला आणि दादांनी लगेच आपले भाषण थांबवले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अजित दादा शांत होताच कार्यक्रमाला उपस्थित सारेच शांत झाले होते. त्यानंतर पुढच्या काही वेळात अजान संपताच अजित दादांनी भाषणाला सुरुवात केली. दरम्यान यावेळी नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत अजित दादांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.
दरम्यान अजित दादांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“भारताच्या मिसाईचे उत्तर आम्ही पण देऊ शकलो असतो, पण आम्ही…” – इम्रान खान
“…हे देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना मान्य आहे का?”, संजय राऊतांचा सवाल
“या” प्रसिद्ध अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले; पोलिसांकडून अटक
“आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल


