मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जगभरात लोकप्रिय आहे, पण तिची मुलगी आराध्या बच्चनची लोकप्रियताही काही कमी नाही. सोशल मीडियावर तिचे फॅनपेज सुद्धा आहेत. त्यामुळे आराध्या बच्चनशी संबंधित कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होते. दरम्यान आराध्या बच्चनच्या फॅन पेजवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्या व्हिडिओतून आराध्याने नेटिझन्सची आणि तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये आराध्या शुद्ध हिंदी बोलताना दिसत आहे. आराध्या बच्चनच्या या व्हिडिओवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आराध्याच्या संस्कारांचे कौतुक करत आहेत.
या व्हिडिओमध्ये चिमुकली आराध्या अतिशय शुद्ध हिंदी भाषेत बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आराध्या ज्या आत्मविश्वासाने हिंदीत बोलत आहे ते पाहून लोक प्रभावित होत आहेत. सोबतच काहीजण असेही म्हणताना दिसत आहेत की आराध्याचे पालनपोषण बाकीच्या स्टार किड्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
Video : "हे तिच्या रक्तात आहे…"; आराध्या बच्चनची शुद्ध हिंदी ऐकून नेटकरी अवाक
(Credit : @aaradhyaraibachchanofficial) pic.twitter.com/NUlLMtyg01— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) March 14, 2022
आराध्या बच्चनच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युझरने लिहिले की, “हे तिच्या रक्तात आहे. तिच्यातील कमालीचा आत्मविश्वास आणि वक्तृत्व गुण अभिषेक आणि ऐश्वर्याकडून आले आहेत. तर हिंदी भाषेचे ज्ञान आणि संस्कार आजी-आजोबांकडून आले आहेत. आराध्या भविष्यात एक अद्भुत व्यक्ती बनेल”. या व्हिडिओवर याच प्रकारच्या अनेक कंमेंट्स पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:


