टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोपल यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी मंगळवारी दिलीप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता.
या प्रवेशानंतर बोलताना सोपल यांनी ‘चांगलं वाटतय, २३ वर्षांनी घरवापसी झाली. तिकिटांचा विषय आला म्हणून सांगतो कार्यकर्त्यांनी, मित्रांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले म्हणून मी हा निर्णय घेतला. शिवसेनेकडून त्याच मतदार संघातून मी निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीने दोनदा तिकीट नाकारलं होतं. तरी अपक्ष म्हणून निवडून आलो. सोबत होतो. शरद पवारांना सोडण्याचा गम नाही पण हुरहूर आहे’ असं विधान सोपल यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना शिखर बँकेसंदर्भात माझंही नाव आहे. मी चौकशीला सामोरं जाईन. शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नोटीस आली. आधी नोटीस आली नाही असंही सोपल म्हणाले आहेत. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक के बाद -ब्रेक के बाद असे प्रवेश होत आहेत. दिलीप आमचे जुने सहकारी आहेत. काही कारणास्तव ते गेले होते, आता पुन्हा मोठ्या ताकदीने ते सेनेत येत आहेत अशा शब्दात सोपल यांचे स्वागत केले.
दरम्यान, दिलीप सोपल निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होती. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखलं जातं. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे. गेल्या महिनाभरापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.
- #पक्षांतर : राष्ट्रवादीचा ‘हा’ मातब्बर नेता भाजपच्या गळाला, मोदींच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता
- तुमच्या सर्वांची ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करा : जयंत पाटील
- रासप प्रवेशावर अभिनेता संजय दत्तने दिले हे उत्तर
- कॉंग्रेसला प.महाराष्ट्रात मोठा धक्का,माजी आमदाराने घेतला भगवा खांद्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

