Share

तुमच्या सर्वांची ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करा : जयंत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य सुरु आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या यात्रेतील पंढरपूर येथील सभेत मोठ विधान केले आहे. त्यांनी ‘आज मंदीचं अरिष्ट घराघरात पोहोचलं आहे. पूर्वी मंदी आली होती परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कवचकुंडलं निर्माण केली होती. मात्र आज काय परिस्थिती आहे? उद्योग, कंपन्या बंद पडल्या आहेतअसं विधान केले आहे. तसेच दुष्काळ, गारपीट, पूर आदी संकट येतात त्यावेळी पवारसाहेब धाऊन येतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे रहा. तुमच्या सर्वांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करा असं आवाहन उपस्थितांना केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये मुख्यमंत्र्यांनी यात्रा काढली होती त्यावेळी त्यांची सत्ता गेली आणि तीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. आमच्या जामखेडच्या शिवस्वराज्य यात्रेत ३० हजार लोक उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांच्या जामखेड येथील महाजनादेश सभेला अवघे चार हजार लोक होते. हा या दोन यात्रेंमधल्या प्रतिसादाचा फरक आहे असं म्हणत महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्व गोंधळाचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला होईल हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!